चांदणी चौक परिसर रमला व्याख्यानात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील संतकबीर वार्ड चांदणी चौक येथे दर वर्षी युवा शक्ती संघटनेच्या वतीने १९ फेब्रुवारी ला शिवजयंजी निमित्त अनेक उपक्रम घेतले जाते. या वर्षी २२ फेब्रुवारीला प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत सोपान कनेरकर यांचे प्रबोधन ठेवण्यात आले होते. २२ फेब्रुवारी २०२५ ला सायंकाळी ७.०० वाजता चांदणी चौक येथे महाराजांवर आधारीत गोंधळ सादर करण्यात आला. नंतर ८.०० वाजता पाहूण्यांचे आगमण झाले व लगेच काही वेळात महाराजांची पुजन व आरती करण्यात आली.

कार्यक्रमा प्रसंगी पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहूण्यांचे भाषण झाली व लगेच युवा प्रबोधनकार सोपान कनेरकर यांच्या प्रबोधनाला सुरवात झाली. प्रबोधनात सोपान कनेरकर यांनी आपली भारतीय संस्कृती काय, आपण करतो काय, आपण आपल्या धर्माला किती महत्व देतो, मुलींना भारतीय पोषाखच अधिक शोभेचे दिसते, भारतिय हिंदूत्वाची संस्कृती कशी जपली जावी यावर आधारित मार्गदर्शन करुन सोपान कनेरकर यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. युवा शक्ती संघटना व हिंदवी प्रतिष्ठान द्वारे आयोजित सोपान कनेरकर यांचे जाहीर व्याख्यानात परीसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती. यावेळी सोपान कनेरकर यांच्या व्याख्यानाने चांदणी चौक परीसर अगदी मंत्रमुग्ध झालेला होता. या कार्यक्रमाला पाहूणे म्हणून जयश्री बोरकर, सुशिला निनावे, राजू हेडाऊ, डॉ.निशांत कुरंजेकर, नाना न्यायखोर, गुड्डु हेडाऊ, मनोहर हेडाऊ, विपुल पराते प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन आदित्य देवगडे यांनी केले. प्रास्ताविक गोवर्धन निनावे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश पांडे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन निनावे, राकेश खेडकर, कुणाल बोकडे, बंटि गिºहेपुंजे, यश चिंचुलकर, आदित्य चौधरी, गौरव चोपकर, सुर्यांश भंडारी, भुषण देशमुख, कृपाल तांडेकर, सौरव तांडेकर, बबलू खंडाईत, विक्की सोनवाने, सागर असाटी, रवी खेडकर, शुभम सोनवाने, प्रद्युम्न्य निनावे, योगेश कोहाड, यश अंबाळकर, लोकेश मदनकर, गौरव पारवे, भुरे मामा व युवाशक्ती संघटनेचे ईतर कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *