भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी राज्य महामार्ग ५४३ वरील किडंगीपार नाल्या वरील ब्रिज जर्जर झाले, असून स्थितीत ब्रिजवरील रस्ताच खड्यात रूपांतरित झाले आहे. परंतु कंत्राट कंपनी ब्रिजचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नाला रस्त्यावर अपघातांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडले आहे. या अपघात ग्रस्त स्थळाची दखल घेत भारतीय जनकल्याण फाउंडेशन यांच्या पुढाकाराने सर्वदलीय व सामाजिक संस्थाच्या पुढाकाराने किडंगीपार जर्जर पुलावर नागरिकांच्या सहभागाने कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आले.
यावेळी यशवंत मानकर, प्रा. सुभाष आकरे, रितेश अग्रवाल, नरेंद्र बाजपेयी, अशोक गप्पू गुप्ता, संतोष श्रीखंडे,राजीव फुंडे, राम चक्रवर्ती, प्रमोद बोहरे, जिल्हा परिषद सदस्य छायाताई नागपुरे, विमलताई कटरे, जगदीश शर्मा, किशोर कावळे, तिरथ येटरे, रवी क्ष्रीरसागर, विजय मेश्राम, राहुल चुटे, जगदीश चुटे, भुमेश शेंडे, मुनेश पंचेस्वर, कगेश राव अभय शाहू, योगेश कावळे, यांच्या उपस्थितीत किडंगीपार ब्रिज वर जोरदार हल्लाबोल करण्यात आले. गोंदिया आमगाव देवरी राज्य महामार्ग ५४३ वरील किडंगीपार नाला यावरील ब्रिज जर्जर स्थितीत तर ब्रिजवरील रस्ताच खड्यात रूपांतरित झाले आहे. या ब्रिज बांधकामासाठी एम. बी. पाटील काँट्रॅकशन कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाने कंत्राट दिले. परंतु सदर कंत्राट कंपनी ब्रिजचे बांधकामाला सात वर्ष लोटूनही अद्याप पूर्ण बांधकाम केले नाही. सदर महामार्गावर किडंगीपार नाला ब्रिजचे बांधकाम झाले नसल्याने ब्रिज पूर्णपणे जर्जर झाले आहे. तर या ब्रिज वरील व क्रमातील मार्ग खड्यात रूपांतरित झाले. यामुळे नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे.
अनेकदा प्रशासनाला व संबधीत विभागाला निवेदने सोपवून कार्य पूर्ण करण्याची मागणी केली. परंतु विभाग व कंत्राटदार या बांधकामाला प्रारंभ करीत नसल्याने नागरिकांनी या विरोधात किडंगीपार नाला ब्रिजवर तीव्र निदर्शने आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी व मार्गक्रम करणा?्या वाहन धारकांनी समर्थन देत त्यांनी कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार निदर्शने व घोषणा देत कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत घालून गुन्हे नोंद करा, ब्रिजवरील अपघातांना जवाबदार कोण ?, नवीन ब्रिज निर्माण झालेच पाहिजे अश्या विविध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी निदर्शन करणारे नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग, व राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी निवेदन देऊन सदर मार्गावरील ब्रिज तात्काळ निर्माण करण्याची मागणी केली.