पिंपळगाव खांबी येथे गोठ्याला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना २३ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे शेतकरी देवदास तरोणे यांच्या घराशेजारी घडली. घटनेत त्यांची जनावरे बचावली असली तरी जनावरांचा चारा व इतर शेतीपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी घटनास्थळाला भेट देत अग्निशमन दलाशी संपर्क केला.

दरम्यान, अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. पिंपळगाव येथील देवदास तरोणे यांच्या घराला लागूनच जनावरांचा गोठा आहे. दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानकच गोठ्याला आग लागली. यावेळी गोठ्यात गाई-म्हशी-बैल असे जवळपास दहा जनावरे बांधलेली होती. अचानक आग लागल्याचे कळताच गावात एकच तारांबळ उडाली. गावकºयांनी घटनेची माहिती जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांना दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क केला. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. जिप अध्यक्ष भेंडारकर यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. अचानक लागलेल्या आगीमुळे गोपालक व शेतकरी देवदास तरोणे यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी जिप अध्यक्ष भेंडारकर यांनी शेतकरी तरोणे यांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी पंस उपसभापती संदीप कापगते, सरपंच विलास फुंडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *