भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम खोकरला येथील नाला व स्मशानभुमी च्या जागेवर मंगल कार्यालयाचे संचालकाने अतिक्रमण करीत अवैध बांधकाम केल्याने सदर बांधकाम तात्काळ काढुन सदर जागा मोकळी करण्यात यावी अशी मागणी खोकरला ग्रामवासीयांनी पत्रकार परिषदेतुन केली असुन यासंदर्भात ग्रामस्थांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना निवेदनसुध्दा दिले आहे. भंडारा शहरालगत असलेल्या मौजा खोकरला येथील साझा क्र१३ भूमापन क्र१२१/१/१ मधील ०.५० हे.आर जागा स्मशानभुमी करीता तर ०.१३ हे.आर.जागेचा ढोरफोडीकरीता निस्तार हक्क देण्यात आलेला आहे.सदर गट क्रमांकामध्ये दोन्ही मिळुन ०.६३ हे.आर.जागा असुन सध्यास्थितीत सदर जागा कमी असल्याचे दिसुन येत आहे. स्मशानभुमी व ढोरफोडीला लागुन असलेली गट क्र१२१/१/७ क्षेत्रफळ ०.२४ हे.आर. जागा दिपक मनोहर समर्थ यांची असुन त्यांनी सदर जागेवर मंगल कार्यालयाचे बांधकाम केले आहे.
त्यांनी सदर मंगल कार्यालयाचे बांधकाम करतांना फक्त तीन हजार चौ.फुट इतकेच बांधकामाची परवानगी घेण्यात आल्याची माहिती आहे.मात्र सध्या स्थितीत त्या मंगल कार्यालयाचे बांधकाम अनेक पटिने वाढविण्यात आल्याचे दिसुन येते.या सर्व प्रकारातुन मंगल कार्यालयाचे संचालक दिपक मनोहर समर्थ यांनी मंगल कार्यालयाला लागुन असलेल्या स्मशानभुमी व महसुल विभागाच्या नाल्याच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनात येत आहे. करीता सदर मंगल कार्यालयाचेकेलेले अतिक्रमण काढुन स्मशानभुमी व नाल्याची जागा मोकळी करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.प्रशासनाने याची दखल न घेतल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाराही गावकºयांनी पत्रकार परिषदेतुन दिला आहे.पत्रकार परिषदेला माजी सरपंच राजु वडे,माजी उपसरपंच रोहित सार्वे, आमदेव ठवकर,मनोहर धांडे, मंगेश ढेंगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.