भंडारा जिल्हा देखरेख संघाची निवडणूक अविरोध

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा देखरेख संघाची निवडणूक दि. ९ मार्च २०२५ रोजी होणार होती. परंतु जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या मार्गदर्शनात सहकार पॅनलचे नेते खा. प्रफुल्लभाई पटेल तसेच महायुतीतील जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक दि. २५ फेबु्रवारी रोजी अविरोध पार पडली. त्यामध्ये सहकार पॅनलचा दणदणीत विजय होवून देखरेख संघावर सहकार पॅनलेने कब्जा केला. भंडारा जिल्हा देखरेख संघाची निवडणूक हि दि. ९मार्च २०२५ रोजी होणार होती. परंतु सहकार महर्षी तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी महायुतीतील जिल्ह्यातील नेते खा. प्रफुल्ल पटेल, आ. परिणय फुके, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजु कारेमोर, माजी आ. राजेंद्र जैन, तथा माजी आ. चरण वाघमारेयांच्याशी होणाºया निवडणूकीबाबत चर्चा करून ही निवडणूक अविरोध कशी पार पडेल याची व्ह्युव रचना आखून दि. २५ फेबु्रवारी रोजी अविरोध निवडणूक करून दाखविली. यामुळे सहकार क्षेत्रात सुनील फुंडे यांचे कौतूक करण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा देखरेख सहकारी संघ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सेवा सहकारी संस्थेचा कारभार चालवतो. जिल्ह्यात एकूण ३६४ संस्था आहेत. मागील २० वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यपद सुनील फुंडे पद भूषवीत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीपुर्वीच भंडारा जिल्हा देखरेख संघाची पुर्ण निवडणूकच अविरोध निवडूण आल्याने होणाºया मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीला महत्व प्राप्त झाले आहे. भंडारा जिल्हादेखरेख संघाच्या निवडणूकीत सहकार पॅनलचे अविरोध निवडूण आलेले रामदयाल सेवकराम पारधी- सेवा सहकारी संस्था तुमसर, होमराज मार्केंडराव कापगते- सेवा सहकारी संस्था साकोली, विनायक सोमाजी बुरडे- सेवा सहकारी संस्था लाखनी, भैय्याजी नत्थुजी गभणे- सेवा सहकारी संस्था मोहाडी, सुखराम श्यामदेव अतकरी- सेवा सहकारी संस्था भंडारा, देविदास किसन राऊतसेवा सहकारी संस्था लाखांदूर, योगेश संतोष मोहरकर सेवा सहकारी संस्था पवनी, प्रदीप रामचंद्र वर्कर इतर मागासवर्गीय, शैलेश हरिभाऊ गजभियेअनुसुचित जाती, गणेशराम तुळशीराम बावणे वि.जे.य. हे सर्व सदस्य अविरोध निवडूण आले. जिल्ह्यातील महायुती पॅनलवरच्या देखरेख संघाच्या सर्व सदस्यांचे आभार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *