यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी: श्री संत जगनाडे चौक,मोहाडी येथून १० किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या तीरावर असलेल्या शिव जालंधरनाथ मंदीर,मुंढरी बुज येथे महाशिवरात्रीनिमित्ताने बुधवार दि.२६ फेब्रुवारी ३०२५ ला महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्ताने व भव्य महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. जिवदायीनी माँ.वैनगंगाच्या कृपा प्रसारामुळे भंडारा जिल्हयातील मुंढरी बु.येथील नदीवरील पुलाचे बांधकामाच्या वेळी नदीपात्रांतील खोदाईच्या ठिकाणी अंदाजे १० फुट आत प्रथम पंचमुखी नागाचे दर्शन झाल्यानंतर उत्सुकतावश पुन्हा खोदुन पाहील्यावर त्याखाली भगवान शिवाची पिंडी असल्याचे दि.२५ मे २०२२ रोजी दिसुन आले.त्या प्रगट झालेल्या भगवान शिवच्या पिंडीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम दि.२४ ते २६ जानेवारी २०२३ च्या दरम्यान मुंढरी बु.येथे आयोजित करण्यात आलेला होता.व तो मोठ्या थाटामाटाने जनता व जनप्रतिनिधीच्या सहकायार्ने आनंदात साजरा करण्यात आला.
लोक आग्रहास्तव या वर्षापासुन महाशिवरात्रीची यात्रा १८ व २९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत भरवण्याचे शिव जालंधरनाथ मंदीर कमेटीने ठरविले आहे.सनमाननिय आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रनेते श्री श्री रविशंकर महाराजांचे आदरणिय शिष्य श्री.ब्रम्हचैतन्य महाराज बैंगलोर (कर्नाटक) यांचे पावन हस्ते.शिव जालंधर नाथ मुतीर्चे प्राणप्रतिषठेच्या वेळी अशी माहीती मिळाली. की,सन १८७४ साली वैनबंगा मणीला आलेल्या महापुराणे पुराच्या वेळी संपुर्ण मुंढरी बु. गांव जलमय झालेला होता.व त्यावेळी एक भले मोठे वटवृक्ष (बर्गद) नदीत वाहुन आले होते त्या सोबतच सदर पंचमुखी नागासहीत असलेली शिवाची पिंडी वाहत येवुन मुंढरी बु.गावाजवळ स्थिर झाली असावी.असाच कथाय आहे. सदर शिव पिंडीचे प्राणप्रतिष्ठेनंतर अल्पावधीत काही लोकांना प्रत्यक्ष अवाढव्य भुजंगाचे (वासुकी) दर्शन घडत आहे.
ही एक प्रत्यक्ष आश्चयार्चीच बाब आहे. कार्यक्रमाची रुपरेषा बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ ते सकाळी ५.३० ते ९.०० वाजेपर्यंत शिवलिंग सद्अभिषेक प्रकाश डेकाटे महाराज यांचे हस्ते.दुपारी ४ वाजेपासुन महाप्रसाद सर्व गावकरी मुंढरी बु.,मुंढरी खुर्द, कान्हळगांव गावकरी कडून. महाप्रसाद करीता लागणारा भाजीपाला दिपक पराते सब्जी मंडी भंडारा यांचेकडून. संगित खडा तमाशा बुधवार दि.२६ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ ते ९ वाजेपर्यंत. कलंगी पार्टी दुधाळा ह.मु.जयताळा,नागपूर.शाहीर मोरेश्वरभाऊ ढोलक मास्तर गंगाधर शेंडे मेश्रामज्ञानेश्वर सहशाहीर , नकलाकार अरुन खडसे,कोरस क्लाटमास्टर भावराव शेंडे,सर्व गावकरी तर्फे.लोककला सरगम लावणी डॉन्स ग्रुप जबलपूर (छत्तिसगढ)झाकी सहीत बुधवार, दि.२६ फेब्रुवारी २०२५ ला रात्री ९.०० वाजता.असे शिव जालंधरनाथ मंदीर कमेटी व ग्रामवासी मुंढरी बु.होईल. असे अध्यक्ष रामेश्वर कावळे, देवचंद उमरे,दामोधर नंदनवार, प्रकाश डेकाटे,हेमराज उके,सदस्य शुभम म.निमजे,पांडुरंग नंदनवार,राजु जुनघरे,उमेश मेश्राम,क्रिष्णा बांते,केशव नंदनवार,लिलाधर ढेकले,देवेंद निमजे, घि.पुर्वश विजय लाडसे,सुलोचना डेकाटे, माया कामथे,सुरेखा शेन्डे,कांता सोनवाने,पुष्पा सोनवाने,वंदना उके,लता नंदनवार,पुनम मेश्राम,कु.हरसा ढेकले यांनी कळविले आहे.