भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : दिनांक २४ रोजी रात्री १० वाजता चे दरम्यान तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, शिपाई शैलेश दमाहे ,धनंजय बारई, गोलू खराबे,चालक पोलीस शिपाई अख्तर शेख यांचे सह काचेवाणी परिसरात गस्तिवर असताना त्यांना गोंदियाकडून एक ट्रक भरधाव वेगात येत असल्याचे दिसल्यावरून संशय आल्याने त्यांनी हा ट्रक थांबवून ट्रकचे डाल्याची पाहणी केली असता या ट्रकमध्ये लाल ,पांढरे व काळे रंगाचे १७ गोवंश( बैल/गोरे) दाटी वाटीने चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अमानुषपणे वाहतूक करीत असल्याचे दिसल्यावरून ट्रक क्रमांक एम. एच. ४० वाय ७७२१ ताब्यात घेऊन ट्रक चालक गुर्जीत सिंग गुरनाम सिंग भिंडर ४५ वर्ष रा. टेका नाका नागपूर, मजहर कमाल बेग वय ३२ रा. चंगेरा तालुका जिल्हा गोंदिया, साकीब तालीब खान वय २८ वर्षे राहणार चंगेरा या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरोधात प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(ड) (ई), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५,६,९ ,नुसार गुन्हा दाखल करून ट्रक अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये व जनावरे किंमत अंदाजे १ लक्ष ५० हजार असा एकूण १६ लक्ष ५० हजार रुपयाचा माल जप्त करून जनावरे रजेगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित वानखडे करीत आहेत.
अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणारा ट्रक तिरोडा पोलिसांनी घेतला ताब्यात
