भंडारा पत्रिका प्रतिनिधी खापा (तुमसर ) : तुमसर-तिरोडा मार्गावरील देव्हाडा बुज. चौकात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार फेकला गेला व जखमी झाला. धडक बसताच दुचाकीने अचानक पेट घेतला, त्यामुळे उपस्थित लोकांनी ‘बर्निंग मोटारसायकल’चा थरार अनुभवला. अपघातात रामकृष्ण दशरथ उपरिकर (रा. उमरवाडा, तुमसर) हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी तातडीने करडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी टिप्पर आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्परच्या धडकेत मोटर सायकलस्वार गंभीर जखमी
