भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : जवळच असलेल्या चांदपूर येथील दिवाकर नामदेव चोपकर वय ४५ वर्ष यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले .यात चोपकर परिवार उघड्यावर आला आहे.ही घटना २३ फेब्रुवार रोजी सा. ६ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.चांदपुर येथील गोवारी समाजाचा संमेलन त्यांच्यासाठी अभिशापच ठरला की काय असे वाटते. तुमसर मोहाडी क्षेत्रातील गोवारी समाजाचा संमेलन २३ फेब्रुवारी रोजी चांदपूरच्या हेलीपॅड मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
या संमेलनात चोपकर परिवाराचाही कुटुंब सहभागी झाला होता. सा.६ चे सुमारास नामदेव चोपकर यांचे घराला आग लागल्याचे वृत्त कळताच ग्रामवासी व संमेलनात उपस्थित असलेल्या जनसमुदायाने घटना स्थळावर धाव घेतली परंतु आग इतकी भयानक होती ती पाहता पाहता नामदेव चोपकर यांचे घराबरोबरच भाऊ संजय चोपकर यांचेही घराला आगीने वेडा घातला व दोन्ही भावाचे संपूर्ण घर जळून खाक झाले. चोपकर परिवाराचा कपडे शिवण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे कडे तीन शिलाई मशीनी होत्या त्या तिन्ही मशीन व ग्राहकांचे कपडे जळून खाक झाले.या भीषण अग्निकांडात चोपकर परिवाराचे टीव्ही,पंखे, कुलर,सोन्या चांदीचे दागिने व जीवनावश्यक वस्तू सह अन्न धान्य सुद्धा जळून खाक झाले आहे. चोपकर कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चांदपूर वासियांनी केली आहे.
राजमुद्रा ग्रुप ने दिला एक हात मदतीचा
चांदपूर येथील नामदेव चोकर व संजय चोपकर यांचे घराला भीषण आग लागून घर भस्मसात झाले आहे.कुटुंब उघड्यावर आले आहे. जीवनाशक वस्तू जळून खाक झाले आहेत. त्यां कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून राजमुद्रा ग्रुप तुमसरच्या वतीने जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या.यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजिनीयर सागर गभणे,मीरा भट्ट,मिलन निमजे,पल्लवी निनावे,राहुल रणदिवे व बापू बडवाईक उपस्थित होते.