भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अवकाशातील नवग्रहांच्या स्थितीप्रमाणे १४४ वर्षाच्या अंतराने महाकुंभाचे पवित्र आयोजन करण्यात येते यावर्षी मकर संक्रांत ते महाशिवरात्री हा कालावधी महाकुंभच्या आयोजनाचा निश्चित झाला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या पुढाकाराने या महाकुंभाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. भारतातीलच नव्हे ते अखिल विश्वातील सुमारे ६५ कोटी अबाल वृद्धांनी या पवित्र पवार्चे पुण्य स्नान केले. महाश्-ि ावरात्रीचा दिवस या पवार्तील शेवटच्या दिवस, या शेवटच्या दिवसापर्यंतही ज्या भाविकांना प्रबळ इच्छा असून देखील काही अडचणीमुळे प्रयागराज येथे संगमात स्नान करण्याकरिता जाता आले नाही, अशांसाठी महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वावर भंडारा येथे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमातील पवित्र जल टँकरच्या सहाय्याने माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने आणण्यात आले व बहिरंगेश्वर मंदिराच्या खाम तलाव परिसरात महा कुंभच्या स्नानाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. याचे आयोजन सकल हिंदू समाज संघटनेने केले व या पवित्र स्नानाचा लाभ सुमारे सात हजारच्या वर श्रद्धाळूंनी घेतला.
सुनिल मेंढे यांनी महाकुंभच्या शेवटच्या दिवशी आपल्याला पवित्र स्नानाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाविकांकडून कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसत होते. या प्रसंगी उल्हास फडके, रामदासजी शहारे, संजयजी एकापुरे, चैतन्यजी उमाळकर, मयुरजी बिसेन, सौ. शुभांगी मेंढे, आशुजी गोंडाणे, कृष्णकुमार बत्रा, सचिन कुंभलकर, मंगेश वंजारी, कैलाश तांडेकर, राकेश सेलोकर, कैलाश कुरंजेकर, शिव आजबले, विकास मदनकर, नितीन कडव, रोहशन काटेखाये, अमित बिसने, भूपेश तलमले, सुदीप शहारे, माला बगमारे, मंजिरी पनवेलकर, चंद्रकला भोपे, मधुरा मदनकर, साधना त्रिवेदी, रोशनी पडोळे, जया हिंगे, अर्चना श्रीवास्तव, श्रद्धा डोंगरे, स्नेहा श्रावणकर, रोहिणी आस्वले, शोभा घोलपे, भारती जयस्वाल, नंदू राजपुरोहित आदी उपस्थित होते.