यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मोहाडी तालुक्यात काही परिसरात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. परिसरातील आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटल्याने यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे. मोहाडी तालुक्यात मोजक्याच शेतकºयांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा,तर दुर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूवीर्ची वनराई तोडून टाकली आहे.

ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकºयांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे आकाराने लहान व उंचीलादेखील कमी असतात. बहुतांश शेतकºयांनी नवीन आंब्याच्या जातीसह पुन्हा गावरान आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र काही सजक शेतकरी गावरान आंब्याची आमराई जिवापाड जोपासत त्यातून गावरान आंब्याचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमकास उत्पन्न होते. गावरान आंब्याच्या नियार्तीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीमुळे पुन्हा गावरान आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला आलाआहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या गोडवा व रसाळीची चव चाखण्यास मिळेल, असे वाटत आहे. सध्याचा मोहराचा दरवळणारा सुगंध सुखावणारा ठरत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *