भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोदिया : आज महाशिवरात्री च्या पावन पर्वावर माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी बम बम भोले, ओम नम: शिवाय च्या गजरात शिव धाम नागरा येथे महादेव भोलेबाबाची पुजा-अर्चना व दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला व महाशिवरात्रीच्या समस्त शिव भक्तांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. भोलेनाथ सर्व शिवभक्तांच्या जीवनात सुख – शांती, समृद्धी प्रदान करो व मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना केली. या पावन पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कटंगीकला येथे महाप्रसाद वितरण करण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री निखिल जैन, देवेंद्रनाथ चौबे, अखिलेश सेठ, राजू एन जैन, केतन तुरकर, हरगोविंद चौरसिया, संकल्प जैन, रौनक ठाकुर व मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.*
माजी आ.राजेंद्र जैन यांनी नागरा येथील शिवमंदीरात केली पुजा
