भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आज (२६ फेब्रुवारी) देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारी रोजी माहिती दिली होती की त्यांनी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३५०० कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे.मुख्यमंत्र्यांच्यामाझी लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे पुढील आठवड्यात मिळतील, असे अजित पवार म्हणाले होते. पण आठवडा उलटूनही महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली नाही. यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजनेसाठी महिला आणिबालविकास विभागाने पैसे दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवण्यात आला. राज्य सरकार पाच प्रमुख निकषांच्या आधारे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करत आहे. यामध्ये वार्षिक अडीच लाख रुपयांची कौटुंबिक उत्पन्न मयार्दा, राज्यातील अधिवास, आधार आणि बँक खात्यातील नाव जुळणे, चारचाकी वाहन आणि सरकारी नोकरी यांचा समावेश आहे. या निकषांची पूर्तता न करणाºया लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येईल. मंत्री अदिती तटकरे काय म्हणाल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी सांगितले होते की, या योजनेत मोठ्या प्रमाणात चौकशी होणार नाही तर ती प्रामुख्याने प्राप्त झालेल्या तक्रारींवर आधारित असेल.