भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिल्ली : सिल्ली परिसरात उन्हाळी धान रोवणीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात असून पाण्याअभावी धान रोवणी खोळंबळी होती, मात्र टेकेपार उपसा सिंचनाच्या कालव्याला पाणी सुटले आणि उन्हाळी धानपिक रोवणीच्या चिखलनीला वेग आला. भात पीक हे जिल्ह्यातील मुख्य पीक असून टेकेपार उपसा सिंचन कालव्याचे शेतकºयांना पाण्याची मुबलक प्रमाणात सोय आहे. त्यामुळे तालुक्यातील सिल्ली परिसरातील बहुतांश शेतकरी खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामात भाताचे पीक घेतात. उन्हाळी हंगामात धानाची लागवड करतांना ज्या शेतकºयांकडे स्वत:च्या सिंचनाची सोय आहे. त्यांनी जानेवारी महिन्यातच उन्हाळी हंगामातील धानाची रोवणी केली. मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही. त्यांना टेकेपार उपसा सिंचनाच्या पाण्याची वाट पहावी लागत असल्याने रोवणीला उशीर होतो. त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी कालव्याचे पाणी लवकर सोडण्यासाठी प्रशासनाला निवेदनही दिले होते. अखेर कालव्याचे पाणी सुटले आणि शेतकºयांचे शेत शिवार ओले झाले. त्यामुळे आता शेतजमिनीची चांगली मशागत होण्यासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतीची चिखलनी करून धान लागवडीची पूर्व तयारी करण्यात येत आहे.
कालव्याचे पाणी सुटल्याने सिल्ली येथील धान रोवणीला वेग आला
