मोटारसायकल चोरटा जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर पोलीसांनी तुमसर परिसर व इतरत्र अशा ८ ठिकाणी मोटारसायकल चोरी करणाºया आरोपीचा शोध लावीत त्याच्या ताब्यातुन २ लाख ९० हजार रूपयांच्या ८ मोटार सायकली जप्त केल्या. विशेष म्हणजे आरोपीने ७ मोटारसायकली या छत्तीसगडमधील दुर्ग व रायपुर इथुन चोरी करून त्या तुमसरात विक्री केल्या होत्या. मागील काही दिवसापासुन तुमसर शहरासह परिसरात दुचाकी चोरीची प्रकरणे वाढत असल्याने तुमसर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण शाखा यांना विशेष सुचना देत चोरीचा छडा लावण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार पोलीसांनी तपासादरम्यान गोपणीय माहीतीच्या आधारे वाल्मिकी उर्फ बालु लोकचंद हरिणखेडेवय ४२ वर्ष रा. पाथरी, ता. गोरेवाडा जि. गोंदिया, ह.मु. बिड गणेशपुर, (बुट्टीबोरी) ता. हिंगणा जि. नागपुर यास ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्याने २ फेब्रु. २०२५ ला तुमसर परिसरातील एक स्प्लेंडर प्रो. गाडी क्र. एमएच ३६ ढ ८०८६ मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल केले त्यासंदर्भात पोलीस स्टेशन तुमसर येथे अप क्रं. ५४/२०२५ कलम३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये नोंद आहे .पोलीसांनी आरोपीची अधिक विचारपुस केली असता आरोपीने दुर्ग, रायपुर (छत्तीसगड) येथुनसुध्दा मोटार सायकली चोरी करुन त्या गाड्या तुमसर येथे विक्री केल्याचे आरोपीने पोलीसांना सांगीतले. पोलीसांनी आरोपीच्या आरोपीने चोरी केलेल्या ८ मोटार सायकली किंमत एकुण २ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन व अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी तुमसर पांडुरंग गोफने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड., पोउपनि प्रविण सयाम, पो. हवा. जयसिंग लिल्हारे, कनोजिया, पो.शि. बंडु काचगुंडे, राजकुमार गिरीपुंजे, परिमल मुलकलवार, चा.पो.शि. कोसरे यांनी केली..

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *