भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : गोबरवाही ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा दैनिक भंडारा पत्रिका वृत्तपत्राचे वरिष्ठ पत्रकार सुरेश बेलुरकर वय ७६ वर्षे यांचे आज दि. २७ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी ४:४५ वाजेच्या दरम्यान अल्पश: आजाराने उपचारा दरम्यान नागपूर येथे निधन झाले. त्यांची अंत्येष्टी २८ फेब्रुवारीला गोबरवाही मोक्षधाम येथे दुपारी १२ वा. करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,दोन मुले,सुना नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. सुरेश बेलुरकर हे तुमसर तालुक्यातील एक धडाडीचे पत्रकार होते. त्यांनी नेहमी आपल्या लेखनीतुन सर्वसामान्य नागरीकांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. ते अत्यंत मनमिळावुन व हसमुख स्वभावाचे होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
पत्रकार सुरेश बेलुरकर यांचे निधन
