भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा स्थानीक गुन्हे शाखा विभागाने अॅल्युमीनीयम तार चोरी च्या गुन्ह्याचा छडा लावीत तीन आरोपींना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता जिल्ह्यातील इतरही काही गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली.पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातुन चोरी केलेला २ लाख ३४ हजार ५३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.आरोपीमध्ये २ विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांपासुन साकोली पोलीस स्टेशन परीसरात अॅल्युमीनीयम तार चोरीचे प्रमाणात वाढ झाल्याने स्था.गु.शा. भंडारा चे पोनि. नितीनकुमार चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात स्थागुशा पथकाला विशेष सुचना देवुन पो.स्टे. साकोली परीसरात चोरांचा शोध घेण्याचे सुरू होते.
दरम्यान स्थागुशाच्या पथकाने गोपणीय माहीतीच्या आधारे जयंत महेंद्र बारसागडे वय २० वर्ष रा. शिवाजी वार्ड, साकोली यास ताब्यात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदार (विधीसंर्घषगस्त बालक) यांच्या मदतीने दि.२० फेब्रु. ला सेंदूरवाफा, साकोली परीसरात दोन अॅल्युमीनीयम तारांचे बंडल चोरी केल्याचे कबुल केले. त्यासंदर्भात पोलीस स्टेशन साकोली येथे अप कं.८६/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये नोंद आहे. तसेच आरोपीची अधिक विचारपुस केली असता दि. २५/ जाने. २०२५ ला सुध्दा सेंदुरवाफा येथे दोन तारांचे बंडल व लोखंडी अॅगल चोरी केल्याचे कबुल केले त्यासंबंधाने पोलीस स्टेशन साकोली येथे अप कं. ३२/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये नोंद आहे. आरोपी जयंत महेंद्र बारसागडे हा आपले कामावर जात असतांना त्याने सालेबर्डी पुर्नवसन येथील बंद घरात प्रवेश करून घरफोडी केल्याचे कबुली दिल्याने त्यासंबंधाने पो.स्टे. जवाहरनगर येथील अभिलेखावर अप कं. १७/२०२५ कलम ३३१(३), ३०५ भा.न्या.सं. अन्वये नोंद आहे.
पोलीसांनी आरोपीचे ताब्यातुन ३ गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल व गुन्हयात वापरलेली त्याची मारुती सुझुकी ८०० कार असा एकुण २,३४,५३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. स्दर कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक (स्थागुशा) नितीनकुमार चिंचोळकर, पोलीस हवालदार नितीन महाजन, राजेश पंचबुधे, प्रफुल कठाणे, पोलीस अंमलदार मंगेश माळोदे, चालक पोलीस हवालदार तिवाडे व पोलीस अंमलदार कौशिक गजभिये यांनी केली.