भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य शासनाने १०० दिवस- ांच्या कृती आराखड्याबाबत जिल्हयातील महत्वाचे प्रश्न असल्यास त्याचा मंत्रालयीन पातळीवर पाठपुरवठा करण्याचे आश्वस्त करत, या शंभर दिवसात ९ प्रमुख मुद्याखेरीज वैशीष्टयपुर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरीक्त मुख्य सचिव उर्जा तथा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आज यंत्रणांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाउर्जा विभागाचे सौर उर्जीकरणाचे सादरीकरण महाउर्जातर्फे करण्यात आले .
सौर उर्जीकरणासाठी शासन आग्रही असून शेतीला सुध्दा सौर उर्जेव्दारे विदयुत पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.लोकाभिमुख होऊन काम करण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्हयातील उमेद बचतगटांच्या प्रगतीचा आढावा घेतला. रेशीम कार्यालय, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस ,आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदींच्या वैशीष्टयपुर्ण कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. जिल्हयातील जलपर्यटन, राजमार्ग व रस्ता दुरूस्ती ,पुर संरक्षक भिंत बांधकाम,शासकीय वैदयकीय महाविदयालय याबाबतही सादरीकरण करण्यात आले.
जिल्हयातील यंत्रणांची महत्वाची कामे ज्याबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा आवश्यक आहे ,त्याबाबत संपर्क व समन्वय करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सगळयात शेवटी जिल्हयातील रिक्त पदांची माहितीही त्यांनी घेतली. कौशल्य विकास ,समाजकल्याण ,महसूल ,नियोजन या विभागातीलरिक्त पदांच्या भरतीबाबत शासनाशी संवाद करण्याचे त्यांनी आश्वस्त केले. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक आहे. १५ एप्रिल २०२५ च्या आत कृती आराखड्यानुसार दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन श्रीमती शुक्ला यांनी केले. यावेळी पोलीस दलातील आय एस ओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचा आयएसओ प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.