आयुध निर्माणी स्फोटातील आणखी एका जखमीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जवाहर नगर आयुध निर्माण कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला होता. तीन जखमींवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. महिनाभर मृत्यूशी झुंज देणाºया जयदीप बॅनर्जी वय ४५ वर्षे, यांनी आज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जवाहर नगरच्या आयुध निर्माण करणाºया कारखान्यामध्ये एलटीपीई २३ (लो टेंपरेचर प्लास्टिक एक्यूपमेंट) विभागात भीषण स्फोट झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी सकाळी घडली होती. हा विभाग अती संवेदनशील असल्याने रोजच्या प्रमाणे अत्यंत सावधगिरीने सर्वजण आपले काम करत होते. मात्र दोनच तासात होत्याचे नव्हते झाले.

एलपीटीई २३ सेक्टरमध्ये अचानक जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे जमिनीत मोठा खड्डा पडला आणि एलपीटीईची अख्खी इमारत एका क्षणात या खड्ड्यात सामावली. या सेक्टरमध्ये काम करणारे कामगार आणि कर्मचारी मलब्यखाली दबले गेले. या दुदैर्वी घटनेत ८ कर्मचाºयांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला होता. या स्फोटात ८ जणांना प्राण गमवावे लागले होते. स्फोटातून तीन जण बचावले होते. त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *