भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरात मुस्लिम समाजाने श्रद्धेने रमजान महिना सुरू केला असून, संपूर्ण महिनाभर रोजा ठेवत, नमाज अदा करत आणि कुराण पठण करून अल्लाहची इबादत करण्यात येत आहे. या पवित्र महिन्याला इस्लाममध्ये विशेष महत्त्व आहे. रमजानच्या पहिल्या दिवशी अनेक लहान मुलांनी पहिला रोजा ठेवून या आध्यात्मिक यात्रेची सुरुवात केली. शहरातील शिजा शोएब भुरा (वय ६ वर्ष), माहीन महबूब शेख ( वय ५ वर्ष ), आमीना रोशन मिर्जा (वय ६ वर्ष), अरशान अजीम अंसारी (वय ७ वर्ष) या चिमुकल्यांनी पहीला रोजा ठेवून अल्लाह ची इबादत केली.
रमजान: पवित्र महिन्यात अल्लाहची इबादत आणि समाजसेवेचा संकल्प
