भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राजकीय नेत्याच्या पाठबळाने व ग्रामपंचायतच्या संगणमताने ठराव मंजूर करून आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात केली आहे. ह्या नाली बांधकामाला नागरिकांचा विरोध असताना,यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायतीला नाली बांधकाम न-करण्यासाठी विनंती करूनही ग्रामपंचायतीने मुजोरपणा दाखवत उसर्रा गावातील वार्ड क्रमांक एक येथील अनेक नागरिकांनी पत्राद्वारे या कामाचा विरोध दर्शवला तरी ग्रामपंचायत ने नागरिकांच्या विरोधात जाऊन आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामासाठी सुरुवात केली आहे.
हा प्रकार मोहाडी तालुक्यातील उसर्रा या गावात घडला असून, या ग्रामपंचायतच्या मुजोर कारभारामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. उसर्रा ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामसेवक हे स्वत:चा मनमर्जी कारभार चालवत असून, आवश्यक असलेल्या ठिकाणी नाली बांधकाम करत नाही, आणि आवश्यक नसलेल्या ठिकाणी नागरिकांच्या विरोधात जाऊन बांधकाम करतात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित उपस्थित केला आहे.वरिष्ठांकडून ग्रामपंचायत उसर्रा येथील पदाधिका?्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.कारवाई न-झाल्यास लवकरच मोठा आंदोलन छेडला जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.