भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : एसटी बस स्थानक तुमसर आगारात मागील सहा महिन्यांपासून परिसर खोदकाम करण्यात आले असल्याने शालेय विद्यार्थी व प्रवासी वर्गातुन तिव्र संताप व्यक्त केल्या जात होता. या आगारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याप्रकरणी आगार व्यवस्थापक भोगे यांना शालेय विद्यार्थी व प्रवाशांना होणाºया गैरसोय व समस्या तातडीने सोडवण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी केली होती.
याप्रकरणी परिवहन महामंडळाच्या विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तातडीने दखल घेऊन एमआयडीसीच्या संबंधित कंत्राटदारांना फटकारले तसेच सहा महिन्यांपासून प्रवाशांना गैरसोय होणाºया आगार परिसरात रखडलेल्या बांधकाम ताबडतोब सुरू करण्याचे निर्देश दिले. याबाबत जिल्ह्यातील बºयाच वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशित झाले होते. याचीच दखल परिवहन महामंडळाने घेऊन संबंधित ठेकेदाराला बांधकामासाठी निर्देश दिले त्यानुसार दिनांक २ मार्च, २०२५ रविवारी रोजी तुमसर आगार परिसरात बांधकामास सुरुवात करण्यात आली आल्याने येथील शालेय विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.