अदानी प्रकल्पात कार्यरत अभियंत्याचा ट्रॅक्टर-मोटार सायकल अपघातात मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अदानी प्रकल्पात अभियंता असलेले ईसम आपले मोटार सायकलने अदानी प्रकल्पाकडे येत असता समोरून येणारे ट्रॅक्टरला धडक बसून गंभीर जखमी झाल्याने गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तिरोडा तालुक्यातील अदानी विद्युत प्रकल्पात अभियंता असलेले अंकित चौरे हे आज दिनांक ३ रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान आपले मोटार सायकल क्रमांक २४ बी. एच. १९३३ ए. ने सकाळी दहा वाजता चे दरम्यान अदानी टाऊनशिप येथून अदानी प्रकल्पाकडे येत असता गुमाधावडा येथून अदानी प्रकल्पासमोरून उधईटोलाकडे जात असलेले ट्रॅक्टर क्रमांक एम. एच .३६ ए .जी. ५६२५ क्रमांकाचे ट्रॅक्टरला धडक बसल्याने अंकित जबरदस्त जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले

याअपघाताची माहिती ट्रॅक्टर चालकाने तिरोडा पोलीस स्टेशन येथे येऊन दिल्यावरून पोलीस निरीक्षक अमित वानखडे, हवालदार योगेश कुळमते, शिपाई गोलू खराबे, मंगेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मोटार सायकल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे जमा केली असून अपघातात जबर जखमी झालेले अंकित चौरे यांचा उपचारादरम्यान गोदिया येथे मृत्यू झाल्याने रामनगर पोलीस स्टेशन गोंदिया येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून या अपघाताचे प्रकरण रामनगर पोलिसांकडून तिरोडा पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिरोडा पोलीस स्टेशन तर्फे पुढील कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *