भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भारत सरकार विधी व न्याय विभागा तर्फे बैरागी वाडा, भंडारा येथील रहिवासी अॅड.संतोषसिंग सुखदेवसिंग चौहाण यांची केंद्र शासना तर्फे नोटरी म्हणून निवड करण्यात आली. अॅड.संतोषसिंग सुखदेवसिंग चौहाण हे भंडारा जिल्हयात गत १५ वर्षापासुन वकिलीचा व्यवसाय करतात. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इत्यादी संघटना सोबत ते जुडलेले असुन त्यांना वकिली व्यवसायाचा दांडगा अनुभव असुन शेतकरी बांधवांवर होणाºया अन्यायावर वाचा फोडण्याची कार्य त्यांच्या वकिलीतून दिसुन येते.त्यांच्या नोटरी म्हणुन नियुक्त झाल्यामुळे भंडारा जिल्हयातील युवक, विद्यार्थी, शेतकरी, व्यवसायीक, सामान्य नागरीकाना सोईचे होईल. अॅड.संतोषसिंग सुखदेवसिंग चौहाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संतोषसिंग चौहाण यांची नोटरी म्हणुन निवड
