मोटारसायकल झाडावर आदळली

भंडारा पत्रिका / तालुका प्रतिनिधी मोहाडी: पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव रोडवर सिद्धेशसाई मंदिरजवळ आंधळगाव वरुन येणारी दुचाकी क्र.एमएच -३६ र १०८९ अनियंत्रित होऊन झाडावर आढळली त्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले तर दोन लहान चिमुकल्यांना किरकोळ जखम झाली घटना रविवार दि.२ मार्च २०२५ ला दुपारी १ वाजता सुमारास घडली.आंधळगाव येथील रहिवासी घनश्याम शेंडे व त्यांची पत्नी व २ मुले एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमास करिता आंधळगाव वरून मांडगीला जात असताना डोंगरगाव ते मोहाडी शेत शिवारात येथे दुचाकी अनियंत्रित झाल्याने झाडावर आदळून अपघात झाला.मोहाडी येथील तीर्थक्षेत्र गायमुख येथील शिवभक्त डोंगरगाव येथील उपसरपंच महेंद्र गभने, ग्रा.प.सदस्य राहुल सेलोकर,महेश विठ्ठल बारई,लिलेश रघुनाथ खराबे,प्रतीश दामू निखारे,संदीप दयाराम किंदरले, आदर्श अशोक बडवाईक यांनी जखमी पती-पत्नींना तात्काळ मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.लुशार्क निंबेकर, अधिपारिचरिका मेघा टेंबरे,निशांत कावळे, कक्षसेवक गजानन बिलबिले यांनी प्रथमोपचार उपचार केले.दुपारी ४ वाजता सुटी देण्यात आली. कोणतीही जीवित हानी झाली नाही.घटनेच्या पुढील तपास मोहाडी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे,बिट अंमलदार मुकेश भोंगाडे,अतुल कुंभलकर हे करीत आहेत.१०८ वर कॉल करूनही अ‍ॅम्बुलन्स ही ४५ मिनिटा नंतर अपघात घटनास्थळी पोचली.अपघात स्थळापासून ग्रामीण रुग्णालय मोहाडी हे अवघे एक किलोमीटरवर असतानाही १०८ नंबर वर कॉल केल्यानंतरही वेळेवर अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही.१०८ नंबरच्या असा अनुभव गावकºयांना या अपघातामुळे अनुभवास मिळाला गावकºयाच्या मदतीने स्वत:च्या वाहनाने जखमींना रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *