यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : भारतात देवदर्शनाची ही गर्दी जगात चर्चेचा विषय ठरली आहे. देवदर्शनाच्या व श्रध्देच्या प्रकारात एक भल्य आयोजन म्हणजे कुंभमेळा. संपूर्ण जगात एकमेव मोठा इव्हेंट म्हणून कुंभमेळ्याकडे पाहिल्या जात आहे. यामध्ये कोट्यावधी लोक गंगा स्नान केले. आणि ही उपस्थिती या धर्म उत्सवाचे महत्त्व विषद करत आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळपास ६३ कोटी लोकांनी कुंभमेळ्यात प्रयागराज येथे गंगा, जमुना व अदृश्य सरस्वतीचे त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे.
आपल्या धर्मात देवदर्शन करण्याची पद्धत आहे. ज्यांचे चारीधाम व बारा ज्योतिर्लिंग दर्शन झाले, त्यांचे सर्वच काही झाले, अशा पद्धतीने समाधानाने आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे. आणि तो लोकांना जाणवलाही पाहिजे, अशा पद्धतीचे देवदर्शन जर झाले तर खºया अर्थाने स्वत:चा सर्वांगिण विकास आणि समाजाच्या विकासाला हातभार लागेल, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील माजी खासदार सुनिल मेंढे यांनी जे ईच्छा असुन सुद्धा प्रयागराज महाकुंभमधे जाऊ शकले नाही अशा भक्तांचा विचार करून भंडारावासियांसाठी प्रयागराज येथून संगम जल घेऊन आले आणि महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर बहिरंगेश्वर मंदिर येथे स्नानसाठी फवारा लावण्यात आलेला होता.
मोहाडी येथील हिंदुत्व समर्पण ग्रूप जो सतत धर्मकार्य करत असतो आणि सक्रिय असतो अशा ह्या ग्रूपने एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तेजस नाना मोहतुरे ह्यांचा माध्यमातून काही जल मोहाडीवासियांना वाटप करण्यासाठी देण्यात यावे अशी विनंती केली होती. माजी खासदार सुनिल मेंढे यांनी हिंदुत्व समर्पण ग्रूपच्या विनंतीला मान्य करून हिंदुत्व समर्पण ग्रूपचे रुपेश गाठे, हरीश डेकाटे, शिवम तलमले, नकुल दिपटे, अश्विन चकोले, स्वरीत मोटघरे, विशाल पारधी, रोहित उके, मिलिंद मोटघरे, तेजस मोहतुरे, संजय गोनाडे, गौरव कहालकर, भावेश कहालकर यांनी चार ड्रम गंगाजल मोहाडी येथे सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवी मंदीरात आणले.
रविवार दि.२ मार्च २०२५ ला हिंदुत्व समर्पण ग्रूपतर्फे सुप्रसिद्ध जागृत आदिशक्ति माता माँ चौंडेश्वरी मंदिरात गंगाजल वाटप कार्यक्रमाचे आयोजन दैनिक भंडारा पत्र्-ि ाकाच्या वृत्तांतून जाहीररित्या करण्यात आले होते. दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत शिवगौरी महिला भजन मंडळ मोहाडी येथील अध्यक्ष वीणा बंडू मारबते, उपाध्यक्ष सुधा शालिक निमकर, सचिव विना वसंता चिंधालोरे, कोषाध्यक्ष गीता बालचंद गायधने, सदस्य लता शिवशंकर गभने, सुषमा आनंदराव साखरवाडे, आशा हिरालाल शेंडे, सुनिता नरेंद्र गायधने, बबीता नंदकिशोर कनोजे, मंदा अमृत धकाते यांनी गणेश, शिव, कृष्णावर आधारित भजने प्रस्तुत केले. सायंकाळी ४.३०वाजता भव्य यज्ञ आहूतीसाठी मा चौंडेश्वरी मंदिरातील पुजारी उमेश चंद्रकृष्ण दुबे,शोभाराम मलेवार यांनी विधीवत मंत्रोपचार केले. मोहाडी येथील नवदांपत्य स्वाती भूषण पशिने, प्रियंका हर्षल गायधने, चंदा अमोल खवास, अश्विनी पलाश पाटील, आरती नरेंद्र गायधने हे जोडीने बसले. ६ वाजता सुप्रसिद्ध जागृत आदिशक्ति माता माँ चौंडेश्वरी मंदिरात आरती करण्यात आली.
सायंकाळी ६.३० गंगाआरती मोहाडी ग्रामवासियांच्या उपस्थितीत करण्यात आली. आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर दोनशेच्यावर कुटुंबातील प्रमुख हिंदू भक्तांनी गंगाजल स्वत: खाली आणलेल्या बॉटलमध्ये गंगाजल भरून घेऊन गेले. याप्रसंगी हिंदुत्व समर्पण ग्रूपचे इंदिरा गांधीवार्डतील रहिवासी सुरेंद्र सुदाम पिसे यांनी सेवा म्हणून पंचाहत्तर किलोच्या महाप्रसाद तयार करून दिला. याप्रसंगी साडेपाचशे भक्तांनी महाप्रसाद ग्रहण केले. ‘यह अभिनंदन हे आस्था का, वंदन है विश्वास का, जयघोष है सनातन का, उद्घोष है महाकुंभ का, हर-हर गंगे…!’ उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथील गंगा-जमुनासरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर आयोजित महाकुंभमेळा त्रिवेणी संगमावरील गंगाजल आणुन मोहाडी येथे गंगापूजन करण्यात आले. हिंदू धर्माचे प्रतीक असलेला महाकुंभपर्वाचा योग हा १४४ वर्षांनी जुळून आला. यानिमित्ताने हिंदू चेतनेचा हा विशाल जनसागर प्रत्यक्ष मोहाडी तालुका येथे पाहायला मिळाला. यशस्वी आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. हिंदुत्व समर्पण ग्रुप मोहाडी यांचे विशेष आभार. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा महाकुंभमेळा येथील गंगाजल आणुन तालुक्यात वाटप केले आणि यशस्वी करण्यासाठी जे नियोजन केले त्याबद्दल मोहाडी हिंदू ग्रामवासीयांनी मानले विशेष आभार.