भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहर व परिसरात गांजा पिणाºयांची संख्या सतत वाढत असून गांजा विकणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते, मात्र ३ मार्च २०२५ रोजी एका गांजा पिणाºयास पोलिसांनी पकडून कारवाई करून त्याच्या कडून माहिती घेतली असता त्यांने गांजा विकणारा बद्दल सांगितलेल्या माहितीवरून तिरोडा पोलिसांनी त्यांने सांगितलेल्या पत्त्यावर धाड टाकली असता तेथे ८६१ ग्राम गांजा मिळाल्याने तीन व्यक्तीवर अंमली पदार्थ अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत शहर व ग्रामीण परिसरात अंमली पदार्थ सेवन करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून यातील काही युवक व व्यक्ती व्यसनाधीन झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असून अंमली पदार्थ विकणारे पोलिसांच्या हाती लागत नव्हते, ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता चे दरम्यान तिरोडा पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार चंद्रभागा नाका स्मशान घाटाजवळ एक इसम अमली पदार्थ बाळगून ओढत असल्याचे माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक अमित वानखडे, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक शुभम नष्टे, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, शिपाई सूर्यकांत खराबे, अमित गायकवाड, महेंद्र अंबादे, चालक पोलीस शिपाई अख्तर शेख, महिला शिपाई भूमिका बोपचे,
अभिलाषा वालदे यांनी चंद्रभागा स्मशान घाटा जवळील नाल्याचे आसपास पाहणी केली असता तेथे एक इसम चिलीम मध्ये गांजा भरून पिण्याचे तयारीत असताना पोलिसांना पाहून पळून जात असता पोलिसांनी त्यास पकडून विचारपूस करून त्याच्या जवळील पदार्थाची पाहणी केली असता हा अमली पदार्थ गांजा असल्याचे समजल्यावरून यास त्याचे नाव गाव व पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव तनवीर अब्दुल कलाम शेख (२१) राहणार जगजीवन वार्ड तिरोडा असे सांगितले. त्याच्या जवळील अमली पदार्थ ताब्यात घेऊन त्याचे वर एन.डी.पी.एस. कायदा १९८५ नुसार फिर्यादी शुभम नसते यांचे फियार्दीवरून गुन्हा नोंद करून त्यास अंमली पदार्थ विकणाºया बाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितल्यानुसार संत रविदास वार्ड तिरोडा येथील धीरज प्रकाश याचे कडून आपण हा पदार्थ घेत असल्याचे सांगितल्यावर तिरोडा पोलिसांनी ३ मार्च रोजी दुपारी संत रविदास वार्ड तिरोडा येथील धिरज प्रकाश बरीयेकर यांचे घरी पंचा समक्ष जाऊन घराची तपासणी केली असता किचनमध्ये एका पिशवीत हिरवा पदार्थ दिसून आल्याने याची शहानिशा केली असता हा अमली पदार्थ गांजा असल्याची खात्री झाल्याने मोजमाप केले असता हा गांजा ८६१ ग्राम किंमत पंचवीस हजार रुपये ताब्यात घेऊन एन डी पी एस अधिनियम १९८५ कलम ८ (क), २०(ब) ्र्र(अ)अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी धीरज प्रकाश बरीयेकर, मनीषा धीरज बरीयेकर, यांचे वर गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत तिरोडा पोलीस करीत असुन. अंमली पदार्थ विरोधात सतत अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांनी दिली आहे.