भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वरठी : नवनिर्माण शिक्षण संस्था द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर सलंग्नित स्व. पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठी हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची संजीवनी आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या इमारत उद्घाटनिय भाषणात तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटक म्हणून आमदार राजूभाऊ कारेमोरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, प्रमुख अतिथी वरठी ग्रामपंचायत मधील सरपंच चांगदेव रघुते, उपसरपंच अनिता गजभिये, डॉ. उल्हासजी फडके, डॉ.हेमंतकुमार देशमुख, शुभांगी सुनील मेंढे, सुधाकर मदनकर संस्थेचे सचिव प्रशांत वाघमारे संस्थेचे कोषाध्यक्ष अँड कैलास भुरे पंचायत समिती मोहाडी माजी सभापती रितेश वासनिक, रातुम नागपुर विद्यापिठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. बबन मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनीय भाषणात आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोय त्या काळामध्ये नव्हती परंतु २००१ पासून आमच्या ग्रामीण भागात स्व. पार्वताबाई मदनकर महाविद्यालय याची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली त्यामुळे विद्यार्थी शिकू लागलेत.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद मदनकर यांचे त्यनी आभार मानले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद मदनकर यांनी महाविद्यालयाच्या २९ जून २००१ स्थापनेपासून तर आतापर्यंतचे संपूर्ण माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांनी आमच्या ग्रामीण भागात शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. महाविद्यालय अस्तित्वात नव्हते परंतु अलीकडच्या काळात महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकू लागले या शिक्षणाची संधी सदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिले.
याप्रसंगी येशस्वी विद्यार्थी कु. ऋतुजा ठवकर आशिष वंजारी सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे नवनिर्माण शिक्षण संस्था व स्व.पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठी याच्याकडून नव निर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील कर्मचारी डॉ. नितीन नवखरे, डॉ.मधुकर गोमासे, डॉ.रजनी भुरे, डॉ. शिवकुमार हटवार, डॉ मनोज भालेकर, डॉ. छाया देशमुख, प्रा. संगीता वखालकर, प्रा. मंगेश काटेखाये, गजानन तुमसरे, लुकेश बुरडे, महेश मदनकर, अमोल समरित, अनिल रामटेके, मुरली भुरे, नितीन वासनिक, अर्चना छोडेस्वार,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक डॉ. विद्या ढोके तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बोरकर यांनी मानले.