भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेली काँग्रेस आज अखेर मंगळवार ४ मार्च रोजी रस्त्यावर उतरली प्रदेश काँग्रेसच्या निर्देशांनुसार शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी गोंदिया येथील गांधी चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारकडून निवडणुकीच्या काळात शेतकºयांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यातआले. मात्र, अद्यापही कर्जमाफी करण्यात आली नाही. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागणीसाठी, लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये देण्यात यावे, धानाला बोनस देण्यात यावे अशा विविध मागण्या करिता गोंदिया उपविभागीय कार्यालयावर एल्गारमोर्चा काढण्यात आला. थकलेला पीकविमा, सिंचन अनुदान देण्यात यावे, या व इतर मागण्या मोर्चात करण्यात आल्या. गोंदिया गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात गोंदिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अमर वराडे, बाबा कटरे, तसेच अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. उपविभागीय अधिकारी मार्फत राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महायुती सरकारच्या धोरणा विरोधात गोंदिया जिल्हा काँग्रेसचे धरणे आंदोलन
