नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दुसºयांना कायद्याचे ज्ञानामृत पाजणाºया वकिलाने शेजारील चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना भंडारा शहरात उघडकीस आली असुन याप्रकरणी नराधम वकिला विरोधात भंडारा पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीसांनी नराधम वकिलाला अटक केली आहे.विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधम वकीलाचे नाव आहे. पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिडीता हि आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहते. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत असून ते नोकरीनिमित्त दुसºया ठिकाणी राहतात. पीडिता व आरोपीविजय रेहपाडे याची मुलगी समवयस्क असल्याने दोघींमध्ये मैत्री झाली. मागील काही महिन्यांपासून दोघींचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे आहे. दोघीही सोसायटीचे परीसरात सोबत खेळत असतात.

घटनेच्या दिवशी दिनांक ३ मार्च रोजी पीडिता नेहमीप्रमाणे सायंकाळच्यासुमारास सोसायटी परिसरात खेळण्याकरीता गेली. मात्र अर्धा तासातच ती घरी रडत रडत परत आली. त्यावेळी आईने ‘ती का रडत आहे ? ’ असे विचारले. मात्र तिचे रडणे थांबत नसल्याने आईने तिला बेडरुममध्ये नेले आणि रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने आईला आपबिती सांगितली. पीडित मुलीने आईला सांगितले की, ती खेळण्याकरीता सोसायटी परिसरात गेली मात्र तिथे तिला तिची मैत्रीण दिसली नाही. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला बोलाविण्याकरीता घरी गेली. त्यावेळी फ्लॅटचे दार मैत्रिणीचे वडील आरोपी विजय रेहपाडे याने उघडले.

पीडीतेने तिची मैत्रीण घरी आहे का? अशी विचारणा केली असता आरोपी विजय रेडपाडे याने घरात खेळत आहे असे खोटे बोलून पीडित मुलीला घरात घेतले आणि बेडरुममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत विजय रेडपाडे या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. तिने त्याला प्रतिरोध केला मात्र वासनांध नराधमाने तिला सोडले नाही. अखेर तिने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर ती रडत रडत घरी आली आणि आईला रेहपाडे याने केलेल्या दुष्कृत्याचे कथन केले. आईने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि विजय रेहपाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून वकिली पेशाला काळिमा फासणाºया या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *