भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा हा विदभार्तील सर्वांत वेगाने विकसित होणा?्या भागांपैकी एक आहे आणि या विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचे नाव झळकत आहे ते म्हणजे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ, शिक्षण आणि नागरी सेवांच्या विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची जिद्द यामुळे गोंदिया जिल्हा नवे मापदंड प्रस्थापित करत आहे. गोंदिया जिल्ह्यातील फुलचूरआणि फुलचूरटोला या दोन गावांना अखेर नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या दोन्ही गावांतील नागरिक अनेक वर्षा ंपासून नगर पंचायतीसाठी प्रयत्नशील होते, परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा निर्णय वारंवार लांबणीवर पडत होता.
मात्र, विधान परिषद सदस्य आणि गोंदियाचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी या विषयाला गांभीर्याने घेतले आणि शासनाकडून नगरपंचायतीसाठी मंजुरी मिळवली. डॉ. फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर तीन मार्च रोजी नगरविकास मंत्रालयाने अधिकृतआदेश जारी केला. आदेश जाहीर होताच फुलचूर आणि फुलचूर टोला गावांमध्ये जल्लोष सुरू झाला. नागरिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. या निर्णयामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, नागरी सुविधा सुधारतील आणि स्थानिक प्रशासन अधिक सक्षम होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
संघर्षाची कहाणी
फुलचूर आणि फुलचूरटोला गावांना नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याचा प्रवास सोपा नव्हता. २१ डिसे ंबर २०१९ रोजी या दोन्ही ग्रामपंचायतींनी नगरपंचायतीसाठीचाप्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रस्ताव वारंवार अडवला जात होता. प्रशासनाच्या टाळाटाळीमुळे हा विषय वारंवार मागे पडत गेला. गावकºयांनी या अन्यायाविरोधात संघर्ष सुरू ठेवला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले गेले. ग्रामस्थांच्या या प्रखर लढ्यामुळे प्रश ासनाला शेवटी जाग आली आणि तत्कालीन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी हा प्रस्ताव शासनाला पाठवला. तरीही निर्णय लांबणीवर पडत राहिला. पण परिणय फुके यांनी हा विषय विधान परिषदेत आणि नगरविकास मंत्रालयात सातत्याने लावून धरला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे २८ फेब्रुवारी २०२४रोजी शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी राजपत्र जारी केले आणि ३ मार्च रोजी अंतिम आदेश काढून या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला.
विकासाचे नवे दूत
गोंदिया जिल्ह्यातील विकासासाठी संघर्ष करणाºया नेत्यांमध्ये डॉ. परिणय फुके आघाडीवर आहेत. त्यांनी या नगर पंचायतीच्या प्रश्नावर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले होते आणि शेवटपर्यंत तो मुद्दा लावून धरला. त्यांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच अखेर फुलचूर आणि फुलचूरटोला गावांना नगरपंचायतीचा दर्जा मिळू शकला. परिणय फुके हे केवळ राजकारणापुरतेच मर्यादित नाहीत, तर ते लोकांच्या मूलभूत गरजांसाठी झटणारे नेते आहेत. गोंदियातील रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे. नगरपंचायत मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा त्यांच्या जनहितैषी कार्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे.