गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा झाल्याचा संशय…!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान घोटाळा असल्याची शंका देवरी येथे तहसिलदार यांनी पकडलेल्या धान भरलेल्या ट्रकवरून व्यक्त केली जात आहे. ट्रक चालकाने ७४८ पोती धान असलेला ट्रक क्रमांक सीजी ०८ एए ७७८३ या ट्रक मध्ये परस्पर राईस मिलमध्ये न नेता छत्तीसगड राज्यात नेत असताना या ट्रक व ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. या संबंधी पणन अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाची धान खरेदी जवळ जवळ अंतिम टप्प्यात असुन ही धान खरेदी केंद्रावरून आता राईस मिल कडेधान नेण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्याद्वारे पाठविण्यात येत आहे.

परंतु या धानाची मोठ्या प्रमाणावर अफरातफर करण्याचं काम सध्या गोंदिया जिल्ह्यातील राईस मिल मालकांकडुन सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना मंगळवार ४ मार्च रोजी उघडकीस आली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी घुमर्रा या आधारभूत धान खरेदी केंद्र- ावरून खरेदी झालेला घान ७४८ पोते हा ट्रकमध्ये भरून एम. पी. राईस मिल कोडमारा या ठिकाणी पाठविण्यासाठी मेमो देण्यात आला होता. परंतु सदर ट्रकमध्ये भरलेले ७४८ घानाचे पोती हे सदर राईस मिल ला न नेता ट्रक चालकाने परस्पर छत्तीसगड राज्यात नेत असताना देवरी येथील पुरवठा निरीक्षक, नायब तहसीलदार तलाठी यांना आढळले आणि या धानाची चौकशी केली असता ट्रक चालकाने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिले.

त्यामुळे हा धान परस्पर राइस मिलमध्ये न नेता इतरत्र ठिकाणी नेण्याचा डाव असल्याची शंका आल्याने या ट्रकला ताब्यात घेण्यात आले आणि याबाबतची पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांना कळविले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शासकीय आधारभूत केंद्रावरून हा धान इतर राज्यात पुरवला जात तर नाही ना अशी शंका या प्रकरणावरून उपस्थित केली जाते आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठा धान घोटाळा असण्याची यावरून चिन्ह दिसत आहेत आता प्रश-ासन याकडे कशाप्रकारे पाहते हे महत्वाचे ठरणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *