भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया चिखला येथील मॅग्नीज खाणीत मॅग्नीज काढण्याचे काम सुरू असताना भूमिगत मँगनीज खाणीचे स्लॅब कोसळून त्याखाली दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज ५ मार्च रोजी पहिल्या पाळीचे काम सुरू असताना सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान मोइल वर्टीकल दोन अंडरग्राउंड लेव्हल ३ मध्ये १०० मीटर खोली असलेल्या ठिकाणी अचानक स्लॅब कोसळले. यावेळी तिथे काम करीत असलेल्या कामगारांपैकी तीन कामगारढिगाºयाखाली दबले गेले.
या अपघातात विजय नंदलाल (५० वर्ष) रा. खरपडी व अरुण जीवनलाल चोरमारे (४१ वर्ष), सीतासावंगी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर सहदेवविश्वकर्मा रा. सीतासावंगी वय ५६ वर्ष यांना गंभीर जखमी अवस्थेत भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी रूग्णालयात उपचार घेणाºया जखमी कामगाराची भेट घेवुन प्रकृतीची विचारपुस केली. या घटनेत आणखी काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी तुमसर तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार संजय जांभुळकर,तलाठी मनोज वरखडे यांनी भेट देत परिस्थिती जाणुन घेतली. घटनास्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.