भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधान परिषदेत मा. राज्यपाल महोदय यांच्या भाषणावर चर्चा करताना डॉ. परिणय फुके यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासावर सखोल विचारमंथन केले. त्यांनी औद्योगिक गुंतवणूक, सिंचन, ग्रीन एनर्जी, पायाभूत सुविधा, आणि रोजगारनिर्मिती यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर आपली मते मांडली.
उद्योग आणि गुंतवणूक
डॉ. फुके यांनी सांगितले की, स्वित्झर्लंडच्या दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने १५.७२ लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार केले आहेत, ज्यामुळे १५ लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्र हा आशियातील सर्वात मोठा “इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन” ठरत असून, उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळत आहे.