भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परीषद अंतर्गत येणाºया प्रशासनातील कार्यरत विविध विभागातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी कामात अनियमितता बाळगत असल्याच्या तक्रारी होत्या, काही कामांमध्ये अनियमितता तर काही नेत्यांच्या आशीर्वादाने बुट्टी मारत असल्याचे दिसून येते, काही नाहक दौरा दाखवून कार्यालयात सतत गैरहजर असल्याने लोकांची कामे होत नसल्याने पायपीट होत असल्याच्या तक्रारी होत्या. वास्तविक स्थिती जाणून घेऊन अनेक वर्षापासून कुंडली मारून बसलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना फेरबदल करून अनेक वर्षापासून ग्रामीण भागात काम करणाºयांना शहरात संधी देण्यासाठी उपाययोजना करावे की काय?
या साठी जिल्हा परीषद अध्यक्षा सौ.कविता जगदिश उईके यांनी जिल्हाभर आकस्मिक दौरा करून गैर हजर कर्मचारी व जिल्हा परीषद अंतर्गत मंजुर कामात झालेली अनियमितता याची पाहाणी करून तशी नियमाप्रमाणे कार्यवाही करू असे सौ. कविता उईकेयांनी सांगितले. जिल्हा परीषद अध्यक्षांनी प्रशासकीय नियंत्रणासाठी ताμयासह प्राथमिक आरोग्य केंद्र धारगांव येथे भेट देऊन आरोग्य केंद्राची पाहणी केली व रूग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याकरीता वैद्यकीय अधिकारी यांना सुचना दिल्या. कोणत्याही तक्रारी झाल्यास कार्यवाही करणार असल्याची सूचना दिल्या.