मद्यधुंद एसटी बस चालक निलंबीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : चालक मद्य प्राशन करून एसटी बस चालवत होता. प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी मुस्लिम लायब्ररी परिसरात बस थांबवली आणि एसटी प्रशासनाला याबाबत तक्रार केली. अधिकाºयांच्या पथकाने तपासणी केली असता चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचे स्पष्ट झाले. अखेर मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाºया राकेश भोयर नामक चालकावर एसटी प्रशासनाने कठोर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे. तुमसर एसटी डेपो अंतर्गत कार्यरत बस चालक राकेश भोयर हा कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून बस चालवत होता. याबाबत प्रवाशांनी परिवहन विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रार केली.

दरम्यान भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी परिसरात बस थांबवून एस.टी. विभागाच्या अधिकाºयांनी त्याची तपासणी केली. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. सिंदेवाही आणि पवनी बसस्थानकातही या चालकाकडून बस वेळेत न सोडण्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तपासणीदरम्यान तो मद्यप्राशन करून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. मद्यधुंद चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असताना एसटी प्रशासन झोपेत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *