भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र गावस्तरावर उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांचा यावेळीच्या जागतिक महिला दिनी ग्राम पंचायतस्तरावर सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतूक करण्यात आले. महिला सभेत सत्कार झाल्याने उत्कृष्ट कार्य करणाºया महिला भारावून गेल्या. जिल्हाभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाणी, स्वच्छता व आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. वॉश रन, स्वच्छता विषयी जनजागृती, आरोग्य तपासणी करून जागतिक महिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दि. ८ मार्च ला जागतिक महिला दिवसानिमित्य विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक घेऊन जिल्हयात सर्वत्र जागतिक महिला दिवस साजरा करण्याच्या सुचना पंचायत समितीस्तरावर देण्यात आल्या होत्या.
भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) माणिक चव्हाण यांचे नेतृत्वात महिला दिनी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हाभर सातही पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांचे नेतृत्वात सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, बचतगट व नागरिकांच्या सहभागाने महिला दिवस उत्साहात पार पडला. ग्राम पंचायत स्तरावर महिलांकरीता वॉश रन (विशेष दौड) चे आयोजन करण्यात आले. ह्यामध्ये महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आंनद घेतला. महिला सभेमध्ये महिलांना पाणी, स्वच्छता, आरोग्यसह अन्य विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या सभेमध्ये महिलांनी आपापल्या कायार्चे अनुभव कथन केले. तसेच वर्षानुवर्षांपासून गावस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाºया महिलांचा गौरव या प्रसंगी करण्यात आला. ग्राम पंचायतीच्या वतीने कुठे शाल, कुठे प्रमाणपत्र, कुठे रोपटे, तर कुठे बुके देऊन गौरव करण्यात आला. पहिल्यादांच महिला दिनी गावस्तरावर पाणी व स्वच्छता, आरोग्य या सह विविध क्षेत्रात कार्य करणाºया महिलांचा गौरव व कौतूक करण्यात आले.
छोटेखानी सत्कारामुळे उत्कृष्ट कार्य करणाºया महिला भारावून गेल्या. सत्कारमृर्ती महिलांनी, प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. कोणतेच क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला नाही. त्यामुळे घर असो कि गाव महिलांचे कार्य व्याख्यानाजोगे असल्याचे सांगितले. महिला दिनी ग्राम पंचायतन स्तरावर आमच्या कायार्ची दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. महिला सभेप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील वैद्यअधिकारी, एएनएम यांनीही सहभागी होऊन महिलांना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन केले. पाणी व स्वच्छता विषयी माहिती दिली. पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील कार्यात महिलांचा सक्रिय सहभाग असावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त रण्यात आली. शुध्द सुरक्षित गुणवत्तापूर्ण पाणी व शाश्वत स्वच्छतेकरीता बिआरसी, सिआरसी, वॉश पिएम यू च्या कर्मचाºयांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महिलांना माहिती दिली.
उत्कृष्ट कार्य करणाºया महिलांचा गौरव करण्यासोबतच महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांनी विविध क्षेत्रात कार्य करताना आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन महिला वैद्यकिय अधिकाºयांनी याप्रसंगी केले. ग्राम पंचायत पार पडलेल्या आरोग्य तपासणी कार्यक्रमात महिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली. याप्रसंगी महिलांनी त्यांच्या मध्ये असलेल्या सुप्त गुणांना चालना दिली. पाणी व स्वच्छतेबाबत पथनाट्ये सादर करून महिलांनी संदेश दिला. राज्य शासनाने महिला अनुकुल ग्राम पंचायत उभारणीवर भर दिला आहे. जिल्ह्यात कटंगधरा (पंचायत समिती साकोली) ची अनुकूल महिला ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी जागतिक महिला दिनी महिलांकरीता प्रशिक्षणे आयोजीत करण्यात आली. काही ठिकाणी प्रर्दशने,स्टॉल लावण्यात आली. विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.