आज महाराष्टÑ राज्याचा अर्थ संकल्प घोषित करण्यात आला असून त्यामध्ये कृषी, ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते ,बेरोजगार युवक, शिक्षण ,आरोग्य , मूलभूत गरजा या संबंधाने कोणते ही ठोस धोरण नसून केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली. ग्रामीण भागातील आरोग्य करीता पुरेसे डॉक्टर नर्स ,औषधी नाहीत , शिक्षा क्षेत्रात शिक्षक नाहीत ,मनरेगा ची कामे बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत, शेतकºयांचे धनाचे पैसे, बोनस अजून मिळाले नाही ,२० तास विद्युत पंपाचे भारनियमन आहे कांदा उत्पादक शेतकरी रडतो आह. राज्यावर फार मोठे कर्ज आहे. पेय जल मिशन ची कामे निधी अभावी रखडली आहेत. जनता हताश आहे. कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली आहे आणि सरकार फक्त फोकणाळ घोषणाबाजी करित आहे.
मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी