ग्रामीण भागाची निराशा करणारा अर्थसंकल्प!

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली वाहन करवाढ, मुद्रांकामध्ये वाढ ही वाढ थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहचविण्याचा घाट असलेली योजना आहे. गाळमुक्त योजनेच्या मागील वर्षाचे पैसे अजूनही थकीत आहेत. विविध योजनेतील बांधकामांना वर्षभर निधी नाही, महिलांसाठी लाडकी बहीण योजनेमध्ये २१०० रुपयाची वाढ करण्याची घोषणा ही फक्त निवडणुकीपुरतीच असल्याचे या बजेट मधुन दिसून येते. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना पावसाच्या व निसर्गाच्या लहरीपणामुळे बसलेली झळ सोसण्यावाचून शासनाकडून कोणताही मोबदला मिळालेला नाही. शासनाचे धान उत्पादक भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असुन त्यांना कोणताही ठोस आधार या अर्थसंकल्पातुन मिळालेला नाही. कर्जमाफी, गोपीनाथ मुंडे योजनेच्या निधीपासून शेतकरी कुटुंब आजही वंचित आहेत. धानाला बोनस नाही. विधवा , अपंग, निराधार यांच्यासाठी सरकारजवळ पैसे नसल्याने ते अनेक दिवसापासून मानधनापासून वंचित आहेत. ग्रामीण भागाची निराशा करणारा अर्थ संकल्प असल्याची प्रतिक्रिया राष्टÑवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *