प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूतीर्ला बळ देणारा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प महायुती सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज सादर केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही… असे निर्धार वाक्य असलेला हा यंदाचा संकल्प महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर नेणार आहे. तर शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘ विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा यंदाचा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आमचे महायुती सरकार निश्चितच राज्याचा विकास साधेल असा ठाम विश्वास आहे..!! यासाठी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
आमदार डॉ. परिणय फुके विधान परिषद सदस्य