राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे राज्य विकासाला गती देणारा आणि सर्वच क्षेत्रात परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने केलेल्या नियोजनाचा लेखाजोखा मांडणारा होता, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, रोजगार, सिंचन यासह अन्य पायाभूत सुविधांचा सांगोपांग विचार करून ठेवलेला ताळेबंद आहे. जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात त्यांची भूमिका पूर्व विदर्भातील शेतकºयांना दिलासा देणारी आहे. २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची त्यांची आश्वासन नक्कीच जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकºयांना मार्गदर्शन, सूचना आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची निर्मिती, तालुका तेथे बाजार समिती अशा अनेक गोष्टींमुळे या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आले आहे. हातमाग विनकारांसाठी नागपूर येथे उभारले जाणारे केंद्र नव्या रोजगाराची दिशा स्पष्ट करणारा आहे. लाडकी बहिणी योजनेसाठी करण्यात आलेली ३६ हजार कोटींची तरतूद सरकारच्या निर्धाराची दिशा स्पष्ट करणारी आहे. अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या आणि व्यापक विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा असल्याचे सुनील मेंढे म्हणाले.
राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प!
