भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : नाकाडोंगरी येथील आंबेडकर विचार मंच समिती द्वारे बिहार येथील महाबोधी महाविहार बोधगया येथे होत असलेल्या महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारताच्या राष्ट्रपती महोदयांना गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनामध्ये महाबोधी बौद्ध विहार बोधगया येथील लोकांचे असून भारत सरकारने बौद्धांना सुपूर्त करावे तसेच १९४९ मध्ये महाबोधी बौध्दविहाराकरिता जो कायदा तयार करण्यात आला, त्या कायद्यात सुधारणा करून चार हिंदू ब्राह्मण व एक हिंदू जिल्हा प्रशासन अधिकारी तसेच चार बौद्ध धर्माचे प्रतिनिधी असावे, अशा प्रकारे दुरुस्ती करण्यात आली.
याबाबत सर्व बौद्ध समाजामध्येनाराजीचे वातावरण आहे. महाबोधी विहार हे बौद्ध धर्म यांचे असून यामध्ये हिंदू पंडितांचा समावेश करू नये. महाबोधी महाविहार ब्राह्मण पंडित यांच्या तावडीतून मुक्त करून सर्व बौद्ध उपासक व उपासिकांना न्याय मिळवून देण्याकरिता व बौद्ध धर्माची विरासत कायम ठेवण्याकरिता आपल्या अनुयाया सोबत समितीने निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देतेवेळी निशु गजभिये, संजय मेश्राम, अर्चना डोंगरे, प्रिया रामटेके, दिनेश उके, नरेंद्र गेडाम, सुषमा धारगावे, युवराज भूतांगे इत्यादी बुथ कमिटीच्या सदस्यांनी नाकाडोंगरी, गोबरवाही, सितासावंगी, सुंदरटोला, चिखला, इत्यादी गावातील उपासिका व उपासक यांच्या समवेत घोषणाबाजी करत निवेदन सादर केले.