मुरुम चोरणाºया ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : मुरुम चोरी करून शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न करणाºया ट्रॅक्टर चालकावर लाखनी तहसीलदारांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवार, ११ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता पिंपळगाव (स.) येथे करण्यात आली. आरोपी ट्रॅक्टर मालक दररोज परिसरातून माती आणि मुरुम चोरत होता. नुकतेच लाखोरी गावात ३ व ४ मार्च रोजी माती चोरीची तक्रार आल्यानंतर तहसीलदार धनंजय देशमुख यांचे पथक आरोपीच्या वाहनावर लक्ष ठेवून होते. ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. रामू संपत बुराडे असे आरोपी ट्रॅक्टर मालकाचे नाव असून तो लाखोरी गावचा राहणारा आहे. सुधीर ढेंगे (२४) असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर चालक सुधीर ढेंगे हा मालक रामू बुराडे यांच्या सांगण्यावरून पिंपळगाव (स.) येथील गट क्रमांक ५६३ मधून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीतून मुरुमचे अवैध उत्खनन करत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून रामू बुराडे हा माती, मुरुम यासारख्या गौणखनिजांची अवैधरित्या चोरी करून शासनाचा महसूल बुडवत होता. ३ व ४ मार्च रोजी बुराडे याने लाखोरी गावात अनेक ट्रॉलीमध्ये माती चोरुन नेली. याबाबत तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तहसीलदार धनंजय देशमुख यांनी पथक तयार करून गौणखनिज चोरी करणाºया रामू बुराडे याच्या ट्रॅक्टरवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. पिंपळगाव (स.) येथे पितळी पाईप चोरताना ट्रॅक्टर पकडला. ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रॅक्टरवर नंबर लिहिलेला नव्हता. महसूल विभागाने स्वराज कंपनीचा एमएच ३६ एजी ८७४२ क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडून वाहन तहसील कार्यालयात जमा केले. ही कारवाई तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बेनिलाल मडावी, नायब तहसीलदार उरकुडकर, मंडल अधिकारी वराडे, लिपिक लोकेश बारापात्रे व इतर कर्मचाºयांनी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *