विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गडचिरोली जिल्ह्यात १०० ते १५० राईस मिल्स धानाच्या भरडाईचे काम करतात. यातील निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आले. याबाबत काल,११ मार्च रोजी विधानसभेत प्रश्न मांडण्यात आला. परंतु दोन दिवसांपूर्वी राईस मिल्स कार्यालयातील एजंटसारख्या असलेल्या लोकांनी प्रश्न का लावायचा, लावल्यावर काय होणार आदी चर्चा करीत पैशाची मागणीचाही उल्लेख करण्यात आला. ही संपूर्ण संभाषणाची आॅडिओ क्लिप असल्याचे नमुद करीत यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केला. या एजंट व नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. धानाच्या भरडाईचे काम करणाºया गडचिरोली जिल्ह्यातील १०० ते १५० राईस मिल्सपैकी सात राईस मिल्सने २०२२-२३ मध्ये कमी बँक गॅरंटी दिली.

तीन कोटींच्या बँक गॅरंटीवर सात कोटींची भरडाई केली आहे, असा यांच्यावर ठपका ठेवला होता, याकडे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत लक्ष वेधले. या राईस मिलवर जवळपास २.६७ कोटी रुपये दंड करण्यात आला होता. त्या दंडाची रक्कम ट्रान्सपोर्टरच्या बिलात अ‍ॅडजेस्ट करण्यात आली का? २०२३ मध्ये तत्कालीन मंत्र्यांनी तीन चार राईस मिल्सला क्लिन चिट दिली का? असे प्रश्न उपस्थित करीत काल, ११ मार्च रोजी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे नमुद करीत प्रश्न उपस्थित करण्यासाठी व्यवहार झाला आहे का? विधानसभेत प्रश्न लावण्याच्या दोन दिवसाआधीच्या काही आॅडिओ क्लिप पुढे आल्या आहेत. काहींचे फोनवर संभाषण देखील झाले. या रा-ईस मिल मालकाच्या कार्यालय एजंटसारखे असलेले लोक हा प्रश्न का लावायचा नाही, लावल्यावर काय होणार, अशाप्रकारच्या धमक्या देणाºया क्लिप माज्याकडे असून मी आज आदरणीय गृहमंत्र्यांना याबाबत सूचना दिली, असे डॉ. परिणय फुके यांनी परिषेदत सांगितले.

या प्रकरणात ब्लॅकमेल करणे किंवा पैशाची मागणी करण्यात आली असून यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश आहे. या एजंट व नेत्यांवर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर मा. अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री श्री योगेशजी कदम, यांनी गरीब लोकांना निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा केला जातो, ही बाब मान्य करीत यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. एवढेच नाही तरी कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते किंवा त्यांचे एजंटांवर तसेच गैरफायदा घेणाºयांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. संभाषणाबाबत जी माहिती पुढे आली, ती एकत्रित करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित केली आहे, त्यात सदस्यांना बोलावण्यात येईल, असेही उप मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. ल्लल्लल्ल

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *