भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर : परिसरातील संगम खैरी ( बेट)हे गाव तीन नद्यांचे मधोमध असून सभोवताल डोंगर आहे इथे जाण्यासाठी बोटीचा सहारा घ्यावा लागतो.याच संधीचा फायदा घेऊन येथील निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू गाळण्याचा मोठा व्यवसाय येथील गावक?्यांनी उभा केला आहे .येथील हातभट्टीची दारू परिसरासह लागून असलेल्या नागपुर जिल्ह्यापर्यंत पुरवठा कित्येक वषार्पासून केला जात आहे . परिसरातील संगम खैरी (बेट) येथील डोंगर भागातील निर्जनस्थळी काही व्यक्ती हातभट्टीची दारू गाळण्यासाठी भट्टी लावत असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली होती.मंगळवारीदुपारी पोलिसांनी पाच वेगवेल्या ठिकाणी छापा मारून दारूची भट्टी ,मोहदुल ,मातीचे मडके व अन्य साहित्य उद्ध्वस्त केली. एकूण किंमत १८ लाख ९३ हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
पोलिसांची धाड सत्राची चाहूल हातभट्टी चालकांना मिळाली असता घटना स्थळावरून फरार आरोपी प्रेमकुमार ज्ञानेश्वर मेश्राम, वय ३५ वर्ष, रा. संगम (पु),ता.जि. भंडारा,रुपेश प्राणहंस मेश्राम, वय ३५ वर्ष, रा. संगम (पु), ता.जि.भंडारा,प्रशांत नंदलाल मेश्राम, वय ३७ वर्ष, रा. संगम (पु), ता.जि. भंडारा,हिवराज ताराचंद खंगार, वय ४३ वर्ष, रा. तिडडी, ता.जि. भंडारा,रवि श्रावण मेश्राम, वय ५५ वर्ष, रा. तिडडी, ता. जि. भंडारा,विरुध्द पो. स्टे. जवाहरनगर अप.क्र. ९०/२०२५ कलम ६५ (फ) मदाका अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु आहे. ही कारवाई. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली या कारवाईच्या वेळी पो.नि. भिमाजी पाटील, ठाणेदार जवाहरनगर, पो.हवा. मंगल कुथे, पो.हवा. बालाराम वरकडे,पो.ना. लोकेश शिंगाडे,पो.शि. सचिन नारनवरे पो.शि. राहूल तिडके, सर्व पो. स्टे. जवाहरनगर उपस्थित होते. या कारवाईत १८ लाख ९३ हजार दोनशे रुपयाचामुद्देमाल नष्ट करण्यात आला.