भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचा संघ मर्या.भंडारा ची पदाधिकारी व संचालक मंडळाची निवडणुक अविरोध पार पडली. भंडारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचा संघ मर्या. भंडारा अध्यक्षपदी बाळकृष्ण सार्वे, उपाध्यक्षपदी मो.तारिक कुरैशी तर सचिवपदी रामलाल बोंद्रे यांची अविरोध निवड करण्यात आली. तर संचालकपदी अज्ञान राघोर्ते, आनंदकिशोर जायस्वाल,संदिप नरहरशेट्टीवार, शिरीष आठले, रामलाल हुकरे,हेमंतकुमार अतकारी, छाया माहुरे, रूपाली धुमनखेडे, राजहंस वाडीभस्मे,संजय घोडके,मनोहर हेडावु यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी मिलींद भालेराव यांच्या उपस्थितीत निवडणुक कार्यक्रम पार पाडण्यात आला. ल्लल्लल्ल
जिल्हा सहकारी पतसंस्थाचा संघ मर्या.ची निवडणुक अविरोध
