बहिणींना २१०० रुपये देण्यासाठी सरकारचे काम सुरु – मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे विधानसभेत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली.लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाईंनी तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. आणि सरकारवर आरोप केला. टीका करत ते म्हणाले योजना जाहीर करताना किती महिलांना लाभ मिळत होता? आणि निवडणुकीनंतर किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले. तर हे सर्व प्रकरण रचण्यात आले आल्याचेही ते म्हणाले.

हा सर्व मुद्दा बाजूला करून महिलांना २१०० रुपये कधी मिळणार हे सरकारने सांगावे असेही ते म्हणाले या सर्व प्रश्नावर सप्ष्टीकरण देताना महिला व बालकल्याण मंत्रीआदिती तटकरेंनी योजनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जाहीर करताना स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेतून १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळतो, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. “आॅक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेपूर्वी या योजनेअंतर्गत २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिला लाभार्थी होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये हप्ता दिल्यानंतर हा आकडा २ कोटी ४७ लाखांहून अधिक झाला आहे. त्यामुळे महिलांची संख्या कमी न होता वाढली आहे.” असे कडक उत्तर त्यांनी दिले

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *