भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा आगाराची बपेरा येथे मूक्कामी असलेली बस तिरोडाकडे येत असता वाहनी गावात एका घरासमोर टाकलेले पाण्यावरून मोटर सायकल घसरुन मोटार सायकलचे मागे बसलेली महिला खाली पडून बसचे चाकाखाली आल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना दिनांक १६ रोजी सकाळी वाहणी येथे घडल्याने सिहोरा पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास करीत आहेत. तिरोडा आगाराची बस क्रमांक एम. एच.०६ एस. ८८६० -१५ मार्च रोजी बपेरा येथे मूक्कामी होती.
आज दिनांक १६ रोजी सकाळी ६ वाजता बपेरा येथून निघून सिहोरामार्गे तिरोडा कडे येत असताना सकाळी ६.४५ दरम्यान वाहणी गावातुन समोरुन येत असलेले मोटर सायकल क्रमांक एम.एच. ३६ ए. एफ.४०१० ने येत असलेले होमेश्वर कड, पत्नी मिना कडू व दोन लहान मुलीसह येत असता एका घरासमोर टाकलेले पाण्यावरून मोटार सायकल घसरून मोटरसायकलचे मागे बसलेल्या मीना होमेश्वर कडू ३२ वर्ष या उजव्या बाजूला पडून समोरून येणारे बसचे मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती व मुली डावीकडे पडल्याने सुदैवाने बचावल्या.
बस चालक नीलकंठ मेश्राम वाहक राजकुमार गोरे व बसमधील २७ प्रवासी सुखरूप असून घटनेची माहिती मिळताच सीहोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बस व बस चालकास ताब्यात घेऊन मृतक महीलेचे मृतदेह तुमसर येथे पाठविले. शव विच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले. मृतक महिलेवर तिचे राहते गावी अंतिम संस्कार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तिरोडा आगाराच्या आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून सीहोरा पोलिसांनी बस चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.