भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : गत बुधवारपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. नागपूर शहरात सलग पाचव्या दिवशी पारा ४० अंशांवर राहिला आहे. रविवारी ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा २ अंशाने जास्त होते. उन्हाचे चटके वाढल्याने पंखे, कुलर, एसी सुरु ठेवावे लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कडक उन्हाची झळ कायम राहणार असून १७ आणि मार्च रोजी आकाशात ढग दिसतील. बुधवार, १९ मार्चपासून एकदोन वेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बेससह पश्चिम हिमालयीन भागात हवामानाचे स्वरूप बदलले आहे. राजस्थान आणि आसाममध्येही साइक्लोनिक सकुर्लेशन तयार झाले आहे. त्यामुळे उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्यानेमुळे विदर्भाच्या आकाशात आर्द्रता राहील.हवामान विभागाने नोंदवलेल्या रविवारी ब्रह्मपुरी ४०.९ अंशांसह सर्वांत उष्ण होते. तर अकोला ४०.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
उपराजधानी नागपुर शहरात उन्हाचे चटके वाढत असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना हाती आहेत. महापालिकेने विशेष खबरदारी म्हणून शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ या वेळेतही नागरिकांसाठी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यानांमध्ये नागरिकांसाठी विश्रांतीचीजागा आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांना उद्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेचा त्रास होऊ यासाठी महापालिकेने सर्व बांधकाम मजुरांना वेळेत विश्रांती देण्याचे आदेश दिले आहेत. समाज विकास विभागाच्या वतीने बेघर नागरिकांसाठी निवारा केंद्रात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उष्णतेमुळे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन विभागाला अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, विद्युत विभागाने दुपारच्या वीजपुरवठा खंडित होणार नाही दक्षता घेतली आहे.शहरातील बस स्थानकांवर प्रवाशांसाठी सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाच्या झळांपासून प्रवाशांना संरक्षण मिळावे यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.