भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : खा.डॉ.प्रशांत पडोळे हे आज त्यांष्च्या दैनंदिन दौºयावर असतांना त्यांनी पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा, सोमनाला परिसरातील नहराची पाहणी केली. यावेळी पाण्याअभावी शेतातील धानपीक करपत चालला आहे.पीकांना पाण्याची नितांत गरज आहे. शेतकरी यांना आता भातपिकासाठी पाण्याची आवश्यकता असून त्यासोबतच विजेची सुद्धा गरज आहे. परंतु नहराचे पाणी अद्यापही सोडले गेले नाही. हि बाब लक्षात येताच खा.पडोळे यांनी तात्काळ नेरला उपसा, गोसे विभाग यांच्या अधिकाºयांशी संपर्क करून शेतकºयांच्या भात पिकासाठी पाणी सोडण्याचे निर्देश दिले. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष काँग्रेस मोहन पंचभाई , शंकर तेलमासरे ता. अध्यक्ष पवनी, तुलशीदास बिलवने, दिगांबर वंजारी, तसेच कोंढा, कोसरा, सोमनाला, परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
शेतपिकासाठी तात्काळ पाणी सोडा ! खा. डॉ. प्रशांत पडोळे
